You are currently viewing करुळ घाटात डंपर दरीत कोसळला ; चालकाचा शोध सुरू

करुळ घाटात डंपर दरीत कोसळला ; चालकाचा शोध सुरू

वैभववाडी पोलीस, सह्याद्री जीव रक्षक टिमही घटनास्थळी

वैभववाडी

करुळ घाटात डंपर दरीत कोसळून अपघात झाला आहे. वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. सह्याद्री जीव रक्षक टीम ही घटनास्थळी दाखल झाली आहे. अपघातग्रस्त डंपर चालकाचा शोध सुरू आहे. चालक वाळूच्या ढिगार्‍याखाली असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आज पहाटे वाळूने भरलेला डंपर करून घाट मार्गे जात होता. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक दरीकडील बाजूस कोसळला. वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस कॉन्स्टेबल श्री पवार,श्री. पडवळ व नारणवर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा