फळविमा योजना निकषाबाबत पालकमंत्र्यांसोबत करणार चर्चा – सतीश सावंत

फळविमा योजना निकषाबाबत पालकमंत्र्यांसोबत करणार चर्चा – सतीश सावंत

आंबा उत्पादक शेतक-यांना उपस्थित राहण्याचे आवाहन…

सिंधुदुर्गनगरी
राज्य शासनाने ०५ जून २०२० अन्वये चालू वर्षासाठी हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना जाहीर करतांना काही निकषांमध्ये बदल करण्यात आले.जे शेतक-यांच्या दृष्टीने घातक ठरणारे आहेत.संबंधित निकषांबाबत पालकमंत्र्याबरोबर चर्चा करण्यासाठी सर्व आंबा उत्पादक शेतक-यांनी तसेच या विषयातील माहीतगार व्यक्तींनी सोमवारी १९ऑक्टोंबरला दुपारी २.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय ओरोस येथील सभागृहात उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यश सतिश सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा