You are currently viewing माजगावात शुक्रवारी भजन स्पर्धा

माजगावात शुक्रवारी भजन स्पर्धा

सावंतवाडी

माजगाव – खालची आळी येथील ब्राह्मण मंदिरात शुक्रवारी (ता. ४) खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम पारितोषिक ५००१ रुपये, द्वितीय ३००१ रुपये, तृतीय , २००१ रुपये तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट हार्मोनियम वादक, तबला व पखवाज वादक, गायक यांना वैयक्तिक रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम नोंदणी करणाऱ्या दहा भजन मंडळांना प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक भजनी मंडळांनी मंथन सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा