सावंतवाडी वनविभागाचा उपक्रम; उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड व वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम
कुडाळ / भडगाव :
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२६ रोजी सावंतवाडी वनविभागातील वनपरिक्षेत्र कडावल अंतर्गत भडगाव येथे वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात शासकीय जंगल कक्ष क्रमांक ७ ब मध्ये नारक्या व मिश्र प्रजातींच्या सुमारे २०० रोपांची लागवड करण्यात आली.
हा उपक्रम मा. उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. मिलीश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी श्री. सुनील लाड तथा वनपरिक्षेत्र अधिकारी कडावल श्री. वैभव भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. वृक्षारोपणासह पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमास वनपाल कडावल श्री. सुरेश मेथर, वनरक्षक कडावल श्री. प्रतिराज शिंदे, वनरक्षक भडगाव श्री. सचिन पवार, वनरक्षक पांग्रड श्री. पांडुरंग गाडेकर, वनसेवक श्री. कुंभार, श्री. केरकर, श्री. घाडी तसेच जलद कृती दलाचे सदस्य उपस्थित होते. याशिवाय भडगाव ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.
पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करत हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
