You are currently viewing मंदिरातील दानपेटी फोडताना चोरट्याला पहाटे रंगेहाथ पकडले

मंदिरातील दानपेटी फोडताना चोरट्याला पहाटे रंगेहाथ पकडले

कणकवलीतील नागरिकांची सतर्कता

दान पेटीसह पान टपऱ्यांवर देखील चोरट्याचा डल्ला

कणकवली:

कणकवली शहरात पहाटे 6 वा. च्या सुमारास भालचंद्र महाराज संस्थानकडील बालगोपाळ हनुमान मंदिर मधील दानपेटी फोडून रक्कम लंपास करणाऱ्या एका चोरट्याला कणकवलीतील सतर्क नागरिकांनी रंगेहाथ पकडले. बुधवारी सकाळी ही घटना घडली. कणकवलीतील बालगोपाळ हनुमान मंदिर ची दाना पेटी फोडत असताना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर, अनिल आणावकर यांच्यासह तेथील काहींनी या चोरट्याला पाहिले. व त्याला रंगेहाथ पकडले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या खिशात अजून दान पेट्या फोडलेली रक्कम व पान पट्ट्यांमधील गुटखा, पान मसाला अशा देखील वस्तू आढळून आल्या. याबाबत चोरट्याकडे नागरिकांनी चौकशी केली असता नागवे रोड वरील राम मंदिर मधली दानपेटी चोरट्याने फोडल्याचे सांगितले. या चोट्याला पोलिसांच्या स्वाधीन केले असून, या चोरट्यासोबत अजून एक तरुण होता. मात्र नागरिकांची जाग मिळताच त्यांने पलायन केले. दरम्यान पोलिसांकडून आता या चरोट्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कणकवलीतील नागरिकांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा