You are currently viewing १० जून ला वागदेत शेतकऱ्यांची बैठक

१० जून ला वागदेत शेतकऱ्यांची बैठक

कणकवली :

सिंधुदुर्गातील काजू पिकाला भौगोलिक मानांकन २०१८ प्राप्त झाले आहे. यामध्ये काजू प्रक्रिया उद्योगातील उद्योजकांच्या काजूगराच्या विक्री संदर्भात महाराष्ट्र शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. या माध्यमातून काजू प्रक्रिया उद्योगातून तयार होणाऱ्या काजूगराला जागतिक पातळीवर विक्रीची संधी उद्योजकांना प्राप्त झाली आहे. या संदर्भातील नियोजनासाठी बैठक शुक्रवार १० जूनला दुपारी २:३०वा. गोपुरी आश्रमाच्या प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत काजूगराच्या विक्री संदर्भात नियोजन केले जाणार आहे. तरी ज्यांना पिकाचे भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे त्या उद्योजक, शेतकरी, विक्रेते यांनी या बैठकीस संबंधित उपस्थित रहावे, असे आवाहन कोकण काजू समूहाचे अध्यक्ष व काजू प्रक्रिया उद्योजक सुरेश नेरुरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा