You are currently viewing “वेदांता” विरोधात वाहातुकदार एकवटले; आंदोलन पेटणार?

“वेदांता” विरोधात वाहातुकदार एकवटले; आंदोलन पेटणार?

स्थानिकांच्या मुळावर उठणाऱ्या ठेकेदाराला अद्दल घडवून न्याय मिळवून देणार : बाबुराव धुरी

दोडामार्ग

कायमच वादात असलेल्या वझरे येथील ग्लोबल कोकची “वेदांता” झाली मात्र ठेकेदारांची मनमानी व स्थानिकांची पिळवणूक यामुळे ही कंपनी कायमच वादात राहिली. आता पुन्हा या कंपनी समोर स्थानिक पोट ठेकेदारांनी उपोषणास्त्र उगारले असून हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. कडक पोलीस बंदोबस्त असून सकाळपासून सदर कंपनीत जाणाऱ्या गाड्या व त्यांचे चालक तसेच पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

गेली अनेक वर्षे योगेश महाले, लक्ष्मण गवस, अमर नाईक आदी लोक पोट ठेकेदार म्हणून “जोशी” नामक ठेकेदाराकडे वाहातुक व अन्य कामे करतात मात्र मागच्या वर्षी दिला जाणारा कामाचा मोबदला यावर्षी मागच्या वर्षी पेक्षा कमी दिला जातो यामुळे आपली आर्थिक पिळवणूक होत असल्याचे म्हणत या लोकांनी ग्रामस्थांसह आजपासून उपोषणा सुरुवात केली. यावेळ त्यांनी आपल्या वेदना मांडताना आता आम्ही मागे हटणार नसल्याचा इशारा दिला. आत जाणाऱ्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केल्याने काहीवेळ वातावरण तंग बनले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक जयेश ठाकूर यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आंदोलकांना समज दिली.

दरम्यान याठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आंदोलनाला भेट दिली व आंदोलक तसेच कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. कोणत्याही परीस्थितित आपण आंदोलकांबरोबर असून पिळवणूक करणाऱ्या ठेकेदाराला याचा मोबदला चुकवावा लागेल, असे सांगत आंदोलन चिघळल्यास त्याला संबधित ठेकेदार जबाबदार असेल असे सांगत हा प्रश्न त्याने लवकारात लवकर मार्गी लावावा अन्यथा होणाऱ्या परिणांमाना सामोरे जावे असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =