You are currently viewing कोंकणात आंगणेवाडी आणि होळीसाठी मध्यरेल्वेच्या जादा गाड्या

कोंकणात आंगणेवाडी आणि होळीसाठी मध्यरेल्वेच्या जादा गाड्या

मुंबई

आंगणेवाडी आणि होळीसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर वरून सावंतवाडी साठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

गाडी क्र. 01161 / 01162 लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस (साप्ताहिक) विशेष

गाडी क्रमांक 01161 / 01162 लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड (साप्ताहिक) विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 23 फेब्रुवारी 2022 (बुधवार) रोजी 23.45 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 वाजता ही गाडी सावंतवाडीला पोहोचेल.

गाडी क्रमांक 01162 सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस (साप्ताहिक) विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून 24 फेब्रुवारी 2022 (गुरुवार) रोजी सकाळी 11:00 वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 23:05 वाजता पोहोचेल.

या विशेष गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबतील.

कोच रचना : एकूण 23 कोच = फर्स्ट एसी – 01 कोच, 2 टायर एसी – 01 कोच, 3 टायर एसी – 05 कोच, स्लीपर – 11 कोच, सेकंड सीटिंग – 03 डबे, SLR – 02.

02) गाडी क्र. 01163 / 01164 दादर – सावंतवाडी रोड – दादर (दैनिक) विशेष :

 

* गाडी क्रमांक 01163 दादर – सावंतवाडी रोड (दैनिक) विशेष गाडी दादर येथून 16 ते 19 मार्च 2022 या कालावधीत 12.10 वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी 23.20 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

गाडी क्रमांक 01164 सावंतवाडी रोड – दादर (दैनिक) विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून 16 ते 19 मार्च 2022 पर्यंत 23.50 वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी 11.10 वाजता दादरला पोहोचेल.

या विशेष गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबतील.

कोच रचना : एकूण 17 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 02 कोच, स्लीपर – 07 कोच, सेकंड सीटिंग – 05 कोच, SLR – 02.

वरील गाड्यांसाठी बुकिंग 5 फेब्रुवारीपासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) काऊंटर आणि IRCTC वेबसाईटवर सुरू होईल. सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन इत्यादींसह COVID-19 संबंधी राज्य आणि केंद्र सरकारचे सर्व नियम ट्रेन आणि रेल्वे स्थानकांवर पाळले जावेत. तसेच, प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =