You are currently viewing नवकिरण युवा मंचाने आयोजित केलेल्या खुल्या रांगोळी स्पर्धेत मालवणातील समीर चांदरकर प्रथम

नवकिरण युवा मंचाने आयोजित केलेल्या खुल्या रांगोळी स्पर्धेत मालवणातील समीर चांदरकर प्रथम

दोडामार्ग :

 

दोडामार्ग तालुक्यातील सुरुचीवाडी येथील नवकिरण युवा मंचाने आयोजित केलेल्या खुल्या रांगोळी स्पर्धेत समीर चांदरकर यांनी तर तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धेत श्रीकांत राणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

खुल्या रांगोळी स्पर्धेत मालवण कट्टा येथील समीर चांदरकर यांनी प्रथम, साई पारकर (मालवण ) यांनी द्वितीय , तर केदार टेमकर (कुडाळ) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. चतुर्थ क्रमांक आकाश नाईक (फोंडागोवा) यांनी मिळविला. उत्तेजनार्थ प्रथम श्रेया चांदरकर, द्वितीय रुपम रेडकर व तृतीय पूनम शिरोडकर यांना गौरविण्यात आले.

तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धेत श्रीकांत राणे (गिरोडे) यांनी प्रथम , गौरेश राऊळ (तळकट) द्वितीय, तर साक्षी करमळकर (दोडामार्ग) हिने तृतीय क्रमांक पटकावला. रुचिरा गवस चतुर्थ, मनाली बागकर (दोडामार्ग) व हर्षाली गवस (खोक्रल) यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाले.

विविध गटातील चित्रकला स्पर्धेत पहिली ते चौथी गटात एकूण १२ स्पर्धकांनी भाग घेतला. यात अनुक्रमे ज्ञानेश्वर करमळकर, नव्या गवस, लावण्या गवस यांनी प्रथम तीन तृतीय, तर अंत्रा दळवी हिला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. पाचवी ते सातवी गटात अनुक्रमे ध्रुवी परब, आदर्श नाईक व विष्णू गवस यांनी प्रथम तीन, तर दैविक राणे याने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. आठवी ते दहावी गटात ऐश्वर्या मिरकर, अर्पिता नाईक, वेदिका मिरकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन, तर कल्याणदास कोंडुरकर यास उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.

बक्षीस वितरण सोहळ्यात माजी नगरसेविका रेश्मा कोरगावकर, अंकुश मिरकर, संदीप गवस, मोहन गवंडे, मोहन मणेरीकर, चंद्रकांत खडपकर, प्रकाश सावंत, प्रणय मोरजकर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक अर्जुन परब व नितीन कर्पे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दीपक बुगडे, ध्रुव तांबुळकर, प्रभाकर मयेकर, विशाल चव्हाण, प्रशांत कोरगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले. संदीप गवस यांनी सूत्रसंचालन केले. संजय शिरोडकर यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =