You are currently viewing कणकवलीत दीपावली निमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिराचे आयोजन

कणकवलीत दीपावली निमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिराचे आयोजन

कणकवली :

 

कणकवलीत १ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान दीपावली निमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगचे आनंद अनुभूती शिबीर कणकवली एसटी स्टँड समोर उत्कर्षा लॉजच्यावर दररोज सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात स्वतःची मनशक्ती आणि शारीरिक शक्ती वाढविण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे हे शिबीर अत्यंत उपयोगी आहे. स्वतःमधील नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी, जगविख्यात सुदर्शनक्रिया शिकण्यासाठी, बलवान शरीर आणि शांत मनासाठी, वक्तृत्व, सुप्त गुण आणि संकल्प शक्तीला वाव देण्यासाठी, आपल्या मर्यादा ओलांडून संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य येण्यासाठी, योगसाधनेने आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी, आपल्या भारतीय संस्कृतीची मुळे दृढ करण्यासाठी, स्वत:च्या आणि राष्ट्राच्या स्वावलंबनासाठी, शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ हाेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. शिबीरात भाग घेणार्याचे वय १८ वर्ष पुर्ण झालेले असावे. सहभागी हाेण्यासाठी रजिस्ट्रेशन लिंक : https://aolt.in/659104 नाेंदणी करावी. अधिक माहितीसाठी ७७९८१००१४१ / ९४०४७५३००७ / ९९७०५८२३६५ या माेबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन आयाेजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 2 =