You are currently viewing जिल्हास्तरीय एकपात्री दशावतार अभिनय स्पर्धेचे मळगाव येथे आयोजन

जिल्हास्तरीय एकपात्री दशावतार अभिनय स्पर्धेचे मळगाव येथे आयोजन

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने दशावतार कला जपण्याचा अभिनव उपक्रम

सावंतवाडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे जिल्हास्तरीय एकपात्री दशावतार अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही अभिनव स्पर्धा सोमवार दिनांक १ नोव्हेंबर व मंगळवार दिनांक २ नोव्हेंबर २०२२ या दोन सत्रात होईल.

कोकणातली दशावतार ही लोककला चांगल्या पद्धतीने जोपासली जावी आणि नवोदित कलाकारांना एक चांगले व्यासपीठ मिळावे या उद्देशाने सिंधुदुर्गात प्रथमच ही स्पर्धा मनसेच्या वतीने राबविण्यात आली आहे. विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ आणि मळगाव शाखाध्यक्ष राकेश परब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय एकपात्री दशावतार अभिनय स्पर्धेच्या माध्यमातून मनसेचा हा एक वेगळा उपक्रम राबवून नवोदित कलाकारांना एक नवे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.

१ नोव्हेंबर रोजी लहान वयोगट वर्ष ११ ते २५ व २ नोव्हेंबर रोजी मोठा वयोगट वर्ष २६ ते खुला अशा दोन वयोगटात ही स्पर्धा होणार आहे. दोन्ही स्पर्धाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे. स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी साईल तळकटकर- 7588483763, महेंद्र कांबळी- 8080086092 व शतायू जांभळे- 8208440918 यांच्याशी संपर्क करून करावी. जास्तीत जास्त नवोदित कलाकारांनी बहुसंख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ आणि मळगांव शाखाध्यक्ष राकेश परब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + sixteen =