नीट परिक्षेत मालवणचा झेंडा

नीट परिक्षेत मालवणचा झेंडा

आशिष झाट्ये राज्यात प्रथम

मालवण
वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर झाला. यात मालवणचा सुपुत्र आशिष अविनाश झांट्ये याने 710 गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. नीट परीक्षेचा निकाल रात्री उशिरा जाहीर झाला.
अशीष हा डॉक्टर अविनाश व शिल्पा झांट्ये यांचा सुपुत्र होय. डॉक्टर शशिकांत झांट्ये यांचा नातू होय. डॉक्टर मालविका व डॉक्टर अमोल झाट्ये यांचा पुतण्या होय. नीट परीक्षेत अशिष आणि मिळालेल्या यशाबद्दल मालवणच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. त्याच्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. आशिष येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल आणि कट्टा येथील वराडकर इंग्लिश कॉलेज चा विद्यार्थी होय.

प्रतिक्रिया व्यक्त करा