You are currently viewing जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी

आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे.  तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 37.200 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.940 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी  6.260 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी  9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पुलाजवळ गडनदीची पातळी 35.000 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.200 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 1 =