You are currently viewing सावंतवाडी तालुका सेवादल काँग्रेस अध्यक्षपदी श्री. संजय भिकाजी लाड माडखोल तसेच सावंतवाडी शहरअध्यक्ष पदी श्री. तौकिर शेख यांची निवड

सावंतवाडी तालुका सेवादल काँग्रेस अध्यक्षपदी श्री. संजय भिकाजी लाड माडखोल तसेच सावंतवाडी शहरअध्यक्ष पदी श्री. तौकिर शेख यांची निवड

सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. श्रीकृष्ण तळवडेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

मालवण :

मालवण तारकर्ली येथील लौकिक न्याहरी निवास येथे दिनांक 26/11/2021रोजी सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँग्रेस अध्यक्ष श्री श्रीकृष्‍ण तळवडेकर यांनी सावंतवाडी तालुका सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष श्री संजय भिकाजी लाड माडखोल सावंतवाडी यांना नियुक्ती दिली तसेच सावंतवाडी शहर अध्यक्ष म्हणून श्री तौकिर शेख यांना नियुक्ती देण्यात आली.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस युवक अध्यक्ष श्री देवानंद लुडबे, मालवण तालुका सेवादल अध्यक्ष श्री चंदन पांगे, प्रवीण आचरेकर, संदीप सुकी, बाळा नमशी चंद्रप्रकाश राणे, बाबा म्हापसेकर, मनोहर वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा