You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भंडारी समाज बांधवांची होणार जनगणना – अध्यक्ष रमण वायंगणकर.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भंडारी समाज बांधवांची होणार जनगणना – अध्यक्ष रमण वायंगणकर.

कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची वार्षिक सर्व-साधारण सभा संपन्न..

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिधुदुर्ग ची वार्षिक सर्व साधारण सभा रविवारी दि. 23 ऑक्टोंबर 2022 रोजी  सिद्धीविनायक मंगल कार्यालय कुडाळ येथे महासंघाचे अध्यक्ष- श्री रमण शंकर वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेच्या सुरुवातीला मा.अध्यक्षांनी महासंघांच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला.सचिव विकास वैद्य यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.त्यानंतर जिल्हा खजिनदार लक्ष्मीकांत मुंडीये यांनी गेल्या वर्षभरातील बँक खात्यातील ऑडिटचे वाचन करून सभे समोर ठेवले.

यानंतर भंडारी समाजातील थोर ज्या वेक्ती दिवंगत झाले त्यांना स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.आणि पुढील सभा सुरू करण्यात आली,त्यानंतर सभेपुढील ईतर विषय पुढे ठेऊन सभा चालविण्यात आली.येत्या वर्षभरात सिंधुुर्गातील सर्व भंडारी समाजातील बांधवांची जन – गणना करून घेण्यासाठी ऐका संस्थेची नियुक्ती करण्याचे ठरविण्यात आले आहे.तसा रीतसर अर्ज करून त्या संस्थेची नियुक्ती ही भंडारी महासंघाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.आणि जन गणना करून त्या प्रत्येक कुटुंबाला ओळख पत्र देण्यात येणार आहे असे सभेत ठरविण्यात आले.तसेच सन २०२३ ची भंडारी दिनदर्शिका कढन्याचे ठरविले आहे.त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी , उद्दोजकानी, सहकार्य करावे तसेच डिसेंबर २०२२ अखेर जिल्ह्यातील तरुणांना करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे.दिनदर्शिका २०२२ साठी जास्तीत जास्त भंडारी उद्दोजकानी, सहकार्य करावे असे आव्हान महासंघाचे अध्यक्ष श्री.रमण वायंगणकर यांनी केले आहे.

यावेळी अध्यक्ष श्री.रमण वायंगणकर , सचिव विकास वैद्य,समिल जळवी,राजू गवंडे,निलेश गोवेकर,दीपक कोचरेकर,चंद्रकांत कोचरेकर ,लक्ष्मण मोरजकर, सतिश कांबळी,सीताराम खडपकर,दिवाकर महावळकर ,श्रीकांत वेंगुर्लेकर,शरद पावसकर ,भरत आवळे,प्रदीप वेंगुर्लेकर ,राजेंद्र आंबेरकर,लक्ष्मीकांत मुंडीये, सुनील नाईक ,एकनाथ टेमकर,रामदास तेंडुलकर,प्रियदर्शन कुडव अन्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =