You are currently viewing शिवसाम्राज्य प्रतिष्ठान, फोंडाघाट आयोजित या वर्षीच्या ‘भाऊबीज खड्यात’!!!

शिवसाम्राज्य प्रतिष्ठान, फोंडाघाट आयोजित या वर्षीच्या ‘भाऊबीज खड्यात’!!!

*शिवसाम्राज्य प्रतिष्ठान, फोंडाघाट आयोजित या वर्षीच्या ‘भाऊबीज खड्यात’!!!*

_होय, माझा भाऊ गेला या खड्यात, होय माझे सासरे ‘त्या ‘खड्यात पडून गेले रे, आणि मी कायमची कंबरेतून मोडले रे!!! दादा, मला एकदा बाबांचा चेहरा दाखव ना…. ही आर्त हाक आहे एका बहिणीची जी तुमच्या आमच्या सारख्या कोणाची बहीण, सून, नात, तर कोणाची पत्नी होती. मित्रांनो, हे कुठंच लांबच सांगत नाही आहोत. तर फोंडाघाट मधीलच आहे. हो ,फोंडाघाट, ब्राम्हणगरी ते अगदी घाट पायथ्यापर्यंतच्या रस्त्यावरच….. होय, ही हद्द या फोंडाघाट मधीलच आहे ज्या ठिकाणी आमचे लोकप्रतिनिधी रात्रीच डोळ्यात तेल घालून मतांचा भीक मागत फिरतात….. होय, ह्याच गावातील पुढारी काही प्रमाणात जिल्ह्याच नेतृत्व करतात…… पण आज या रस्त्याच्या खड्याच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरलेत….. आजवर गावातील किती लोकांचे बळी गेले तर किती लोकांच्या खाजगी वाहनांचे नुकसान झाले….. तर कित्येक जण जायबंदी झालेत…. मात्र शासन आणि प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी डोळ्यात ‘याच खड्यातील’ धूळ गेल्याप्रमाणे शांत बसून आहेत….. आणि त्यामुळे कुटुंबात सगळ्यात जास्त डोळ्यात अंजन घालण्याचा काम एक बहीणच करत असते, त्यामुळे भाऊबीज दिवशी तीच बहीण, भर पावसात किंवा तळतळ त्या भर उन्हात रस्त्याच्या बाजूला भावाला भाऊबीज करेल….येणाऱ्या भाऊबीज दिवशी फोंडाघाट मधील प्रत्येक बहिणीने आपला भाऊ आपल्या सोबत सदैव निरोगी, सुरक्षित कोणत्याही प्रकारच शारीरिक नुकसान न होता आणि चांगलं जीवन जगावा यासाठी हा शिवसाम्राज्य प्रतिष्ठान, फोंडाघाटचा एक प्रयत्न असेल. ज्यामध्ये प्रत्येक बहिणीला एक निवेदन देण्यात येईल. ज्यावर सही करून,प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी या प्रशासनाला जाग येउदे म्हणून निवेदनावर सही करावी, त्यानंतर पुढील 10 -15 दिवसात रस्त्याचे काम सुस्थितीत न झाल्यास ‘हेच भाऊ’ त्याच खड्यात बसून उपोषण करून आपल्या बहिणीला एक प्रकारे भाऊबीज देतील……चला तर मग संकल्प करू, यापुढे कुठल्याही बहिणीचा भाऊ या शासनाच्या खड्याचा बळी नाही जाणार……_

*गावाच्या विकासासाठी कृपया सर्व , रिक्षा चालक- मालक, मॅजिक चालक गावातील सर्व सहयोगी ग्रुप, यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष शिवसाम्राज्य प्रतिष्ठान,फोंडाघाट. यांनी केले आहे.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =