You are currently viewing नेटवर्क प्रॉब्लेममुळे कास सोसायटीचा धान्यपुरवठा ठप्प

नेटवर्क प्रॉब्लेममुळे कास सोसायटीचा धान्यपुरवठा ठप्प

ऑफलाईनसाठी स्थानिकांचा पुढाकार

बांदा

नेटवर्क प्रॉब्लेममुळे कास सोसायटीमधील धान्यपुरवठा ठप्प झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच नेटवर्क समस्या दुपारपर्यँत कायम राहिल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पंडीत यांनी सावंतवाडी तहसीलदारांशी संपर्क साधला. तहसीलदारांनी ऑफलाईन पुरवठा करण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे अखेर स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत ऑफलाईन धान्यपुरवठा करण्यात आला. ग्रामीण भागात सध्या नेटवर्क समस्या आहे. त्याचा फटका कास सोसायटीच्या धान्य दुकानाला बसला. आज सकाळपासूनच नेटवर्क समस्या असल्याने ग्राहकांचा खोळंबा झाला. चार तास ताटकळत राहिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. नेटवर्क समस्या रोजचीच असल्याची तक्रार स्थानिकांनी केली.सामाजिक कार्यकर्ते प्रविण पंडीत यांनी नेटवर्क समस्येची माहिती तहसीलदारांना दिली. मात्र ऑफलाईन धान्यपुरवठा करण्यास त्यांनी असमर्थता दाखविली. त्यामुळे स्थानिकांनीच पुढाकार घेत ऑफलाईन धान्य देण्यास सुरुवात केली. यावेळी देविदास सातार्डेकर, प्रविण पंडीत, सुवर्णा पंडीत, ज्ञानेश्वर किनळेकर, सुलोचना पंडीत, मारुती किनळेकर, किर्ती पंडीत, कृष्णा पंडीत, सुप्रिया पंडीत, प्रेरणा राणे, सीताबाई पंडीत, सिताबाई भगत, आनंदी कासकर, सुविता कासकर, विष्णू कासकर, लक्ष्मी कासकर, शुभांगी राणे, पार्वती पंडीत, श्रीराम सातार्डेकर, लवू हरमलकर, मनोहर किनळेकर, गणेश न्हावी, भागिरथी हरमलकर आदींनी पुढाकार घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − one =