You are currently viewing शलाका वालावलकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएच डी.

शलाका वालावलकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएच डी.

सावंतवाडी

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाची प्रा. शलाका रमेश वालावलकर यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच डी पदवी प्राप्त केली .त्यांनी सिंधुदुर्ग जिह्यातील कांदळवनातील जैवविविधता या विषयावर मुंबई विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तिचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले , कार्याध्यक्षा सौ . शुभदादेवी खेमसावंत भोंसले , कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले , युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोंसले, संस्था पदाधिकारी प्रा. डी टी देसाई , अॅड. शामराव सावंत , श्री जयप्रकाश सावंत तसेच प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सौ प्रतीक्षा सावंत यांनी अभिनंदन केले . याप्रसंगी प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. संजय महापुरे . डॉ. गणेश मर्गज , प्रा. रवीना गवस ,आयक्यूएसी कोऑर्डिनेटर डॉ बि. एन. हिरामणी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा