You are currently viewing सलग १३ वर्ष एस.एस.आय कॉम्प्युटरला बेस्ट परफॉर्मिग सेंटर म्हणून पुरस्कार प्राप्त

सलग १३ वर्ष एस.एस.आय कॉम्प्युटरला बेस्ट परफॉर्मिग सेंटर म्हणून पुरस्कार प्राप्त

संचालक रघुनाथ तानावडे यांनी पुरस्कार स्वीकारला

 

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग येथे भेट विभागीय मेळाव्यात “श्री साई इन्फोटेक (एस.एस.आय)” कॉम्प्युटरला सिंधुदुर्गातील “एमएस-सीआयटी” व “क्‍लिक” बेस्ट परफॉर्मिंग सेंटर या पुरस्काराने गौरविण्यात आले. एमकेसीएलच्या संचालकीय व्यवस्थापिका वीणा कामत यांच्या हस्ते “एसएसआय कॉम्प्युटर” चे संचालक रघुनाथ तानावडे यांनी ‍हा पुरस्कार स्वीकारला.

सन २०१० पासून सतत १३ वर्षे बेस्ट परफॉर्मिंग सेंटर म्हणून पुरस्कार मिळवत आहे. सन २०२२ मध्ये महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त “एमएस-सीआटी” व “क्‍लिक” तसेच एमकेसीएल व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ मान्यताप्राप्त “क्‍लिक” चे विविध व्यवसायिक कॉम्प्युटर कोर्सेसमध्ये २०२२ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार प्रधान करण्यात आला. यावेळी ‍रिजनल लिड सेंटरचे जयंत भगत, अतुल पतोडे, अमित रानडे, विकास देसाई, मंगेश जाधव, संतोष कोलते, प्रणव तेली उपस्थित ‍होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा