You are currently viewing सेल्फी

सेल्फी

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*सेल्फी*

प्रतिमा उरी धरोनी मी प्रीतगीत गावे
ते गीत प्रीतीचे रे हळुवार मी म्हणावे
अस्फुट भावनांच्या स्वप्नात गुंग व्हावे…

खरं आहे. प्रत्यक्षाहूनी प्रतीमा उत्कट..म्हणूनच आपण अनेक प्रसंगाचे,जीवनातल्या अनेक सोहळ्यांचे फोटो काढत असतो. अशा अनेक क्षणांना आपण छायाचित्रात बंदीस्त करुन त्या आठवणी कायम स्वरुपात जतन करतो.
आणि खूप वेळा निवांत क्षणी जेव्हां या छायाचित्रांचा अल्बम चाळतो तेव्हां गतस्मृतींत अगदी हरवून जातो.
मनाची गॅलरी पुन्हा एकदा भावभावनांनी गच्च भरून जाते.
खरोखरच त्या पुनरानंदाचा अनुभव अवर्णनीयच असतो..
सहज आठवलं म्हणून सांगते.

लेकीच्या लग्नाची खरेदी चालू होती.मी तिला सहज म्हटले,”अग! इतका महागडा पोशाख तू नंतर कधीतरी घालणार आहेस का? लग्न झाल्यावर तो कपाटातच पडून राहील.”
तेव्हां ती पटकन् म्हणाली “पण लग्राच्या फोटोत तर कायमच राहील ना?
मी गप्प!
पूर्वीही कोडॅक मोमेंट अशी कोडॅक कंपनीची जाहिरात असायची. आणि ते भराभर क्लीक होणारे रंग, भावनांचे विवीध फोटो, बघताना फारच मजा यायची आणि मग
आपणही आपल्या आयुष्यातले कोडॅक मोमेंट्स कॅमेरात टिपत रहायचो.

तीन दांडीवरचा कॅमेरा , निगेटीव्हजचे फोटो स्टुडीओत जाऊन डेव्हलप करणे,नंतर आलेले डीजीटल कॅमेरे,रोल नसलेले कॅमेरे आणि आता तर काय स्मार्ट
मोबाइल्समुळे चोवीस तास कॅमेरा सोबतच..

पूर्वी फोटोग्राफर लागायचे .आता प्रत्येकजण फोटोग्राफर असतो. घरी आलेल्या पाहुण्यांसोबत, केलेल्या खाद्यपदार्थांसोबत, अगदी बाहेर पडणार्‍या पावसा सोबत..
प्रवासात तर जागोजागी..झाडावरची फुले, आकाशातले उगवते मावळते चंद्र,सूर्य तारे..कधी कुणी अवचित एखादी सेलीब्रेटी भेट…आणि असे कितीतरी छोटे मोठे प्रसंग..एक सेल्फी तो मंगतीच है… नव्या जगाची नवी तंत्रे,नवी साधने, अनुभवायला हरकत नाहीच..

कशाला कुणाला नावं ठेवायची..
अगदी कालच..नव्या साडीची घडी मोडली..थोडे हटके दागिने घातले..अगदी नथसुद्धा..आणि काढला की सेल्फी..
गृपवरही पाठवून दिला.भरपूर कमेंट्स,लाईक्स आले आणि मनोमन खूषही झाले.देवजाणे! खरे की खोटे..मनातून म्हणालेही असतील बुढी घोडी लाल लगाम…!!
पण काही काळ का होईना या आभासी आनंदात मीही रमलेच की..
खरेच सारे आभासीच ना अखेर. प्रदर्शनच का हे भावनांचे ,
आम्ही किती मजा करत आहोत हे सार्‍यांना दाखवण्याची ही धडपड तर नाही ना..हातात तंत्र, यंत्र आहे म्हणून ते असे उठसूठ वापरायचे का? खरोखर मन भरतं की फोनची गॅलरी भरते!एक दिवस आपणही या फोनसारखेच हँग.होऊ की…मग काय काय डीलीट कराल..अरे मना!!
या सेल्फायटीसमुळे आधीच खूप डीलीट झालंय् आयुष्यातून..संवाद हरवलेत.मनसोक्त बघण्याचं,ऐकण्याचं
अनुभवण्याचं सुखच संपलय्. समोर फेसळता, दुधाळ धबधबा कोसळतोय् .पण ते नेत्रसुख मनसोक्त अनुभवण्या ऐवजी सारे लक्ष सेल्फी काढण्यात…आणि कधीकधी तर
यातूनच अपघात घडत आहेत.कुणी कड्यावरून कोसळतो.कुणी सागराच्या लाटेत वाहून जातो. कुणी विजेच्या खांबाला धडकतो…अशा घटना ऐकताना, वाचताना मग सहजच वाटते..अती तेथे माती रे!!
सावर रे!! नको इतका वाहवत जाऊ..भानावर ये..पुरे हे आभास.हे सावल्यांचे खेळ..

*राधिका भांडारकर अमेरिका*

Advertisement

_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

*————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा