You are currently viewing टम्म फुगलेली भाकरी…

टम्म फुगलेली भाकरी…

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या बियोंड सेक्स कादंबरीच्या लेखिका सोनल गोडबोले यांचा लेख

काल माझ्या मित्राचा मेसेज आला.. सोनल खुप दिवस झाले , बोललो नाही आपण फोन करु का गं??.. अरे कर ना असं म्हणत मी माझ्या कामाला लागले.. लगेचच त्याने फोन केला. जवळपास २५ मिनीटे तो बोलत होता.. गेली १९ वर्षे तो अमेरिकेत रहातो.. कामासाठी रहावं लागतं हे खरं असलं तरीही त्याला आधीपासूनच बाहेरचा ओढा होता.. आपण जे मागतो ते मिळतं हेच खरं.. खुप पैसे मिळतात , लोकसंख्या कमी, प्रदूषण नाही हे सगळं मीही काही वर्ष तिथे होते त्यामुळे अनुभवलय पण ट्म्म फुगलेल्या खरपुस भाकरीचा सुवास त्या पिझ्झा ला कुठुन येणार ना.. गहुवर्ण त्वचेचे सौंदर्य त्या पांढऱ्या कातडीला कुठुन येणार.. आपल्या काळ्याभोर केसाची मज्जा त्या सोनेरी केसात थोडीच आहे… Hello , how r yu या प्रॅक्टिकल शब्दांपेक्षा कसा हाय रांडीच्या हे कानाला मधुर वाटतं हेच खरं… बाटलीतल्या पाण्यापेक्षा माठाला मातीचा सुगंध आहे आणि तीच माती आपल्या शरीराचं संरक्षण करते..
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तो म्हणाला भारतात यावं कायमस्वरूपी असं खूपदा वाटते गं पण मुलं यायला तयार नाहीत.. मला चुलीवरची आपल्या पाण्यात केलेली ठेचा भाकरी खायचेय गं.. मुलांना त्याचं काय महत्व असणार कारण चुल काय हे त्यांना तरी काय माहीत..
माझी आई गावाकडे असताना चुलीवर स्वयंपाक करायची आणि त्याचा सुवास सगळीकडे पसरायचा… आता माझ्याकडे करोडो रुपये आहेत पण ना चुल ना ती ट्म्म फुगलेली भाकरी आहे… मी एका अर्थाने भिकारीच आहे सोनल.. मी म्हटलं अरे असं काय बोलतोयस?? .. हे सगळं मोठी गाडी, घर सगळं तुलाच हवं होतं ना.. तुझं खरय गं पण आता मागे वळुन पहाताना जाणवतं ना राहीली आई ना बाबा ना खेड्यातील घर.. 😰.. खूपदा भकास वाटतं .. त्याला मी विषय बदलुन कसं बसं शांत केलं आणि विचार केला चार वर्षे अमेरिकेत राहुन आम्ही भारतात आलो हे खुप चांगले केलं नाहीतर आमची अवस्था त्या मित्रासारखी झाली असती.. सगळं असुन काहीही नसल्यासारखं..
ही खरपुस भाकरी भल्या भल्याना विचार करायला लावते हेच खरं…

सोनल गोडबोले
लेखिका.. बियॉन्ड सेक्स

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 2 =