You are currently viewing राज्यात भाजप युतीचं सरकार आल्यानंतर विकास कामे मार्गी – नितेश राणे

राज्यात भाजप युतीचं सरकार आल्यानंतर विकास कामे मार्गी – नितेश राणे

फोंडाघाट बाजारपेठ रूंदीकरण, देवगड गिर्ये येथे मत्स्य विद्यापीठ होणार…

कणकवली

राज्यातील यापूर्वीच्या ठाकरे सरकारने केवळ घोषणाबाजी केली. पण बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप यांचे सरकार आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कोकण विकासाची अनेक विकासकामे तातडीने मार्गी लागत आहेत. यात फोंडाघाट बाजारपेठेचे रूंदीकरण, देवगड गिर्ये येथे मत्स्यविद्यापिठ होणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी आज दिली.

येथील प्रहार भवन येथे श्री. राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, राज्यात बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता कोकणला खर्‍या अर्थाने न्याय मिळताना दिसत आहे. यात आता अनेक वर्षे रखडलेले फोंडाघाट बाजारपेठ रूंदीकरणाचे काम सुरू होणार आहे. तर देवगड गिर्ये येथे मत्स्य विद्यापीठ होणार असून या विद्यापिठाला कोणत्याही क्षणी मंजूरी मिळणार आहे.

राज्यात यापूर्वी नागपूर येथे मत्स्य विद्यापिठ होते. त्याच धर्तीवर सिंधुदुर्गातही मत्स्य विद्यापीठ व्हावे अशी मागणी आम्ही मत्स्य खात्याचेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. त्यांनीही ही बाब सकारात्मकतेने घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तर याविद्यापिठासाठी गिर्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही जागा उपलबध करून दिली. त्यानंतर मत्स्य विद्यापिठाची पूर्ण प्रक्रिया फास्ट ट्रॅक पद्धतीने चालू झाली आहे. लवकरच विद्यापिठाला मंजूरी मिळून काम सुरू होणार आहे. याखेरीज २५-१५ इतर सर्व कामे सुरू होणार असल्याचे श्री.राणे म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 − two =