You are currently viewing हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा अन्यथा वनविभागाला घेरावा – मनसे दोडामार्ग पदाधिकारी प्रविण गवस

हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा अन्यथा वनविभागाला घेरावा – मनसे दोडामार्ग पदाधिकारी प्रविण गवस

दोडामार्ग

गेल्या कित्येक वर्षापासून हत्तींचा सुळसुळाट दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कित्येक लोकांचे आर्थिक नुकसान या हत्तींच्या कळपाने केले. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून उभारलेल्या भातशेतीचे झालेले नुकसान वनविभाग डोळेझाक करत आहे. यावर कायमस्वरूपी कारवाई का करत नाही? असा सवाल श्री गवस यांनी प्रशासनाला विचारला आहे तसेच हत्तींपासून गावातील लोक भयभीत झालेले आहेत कारण काही वर्षांपूर्वी कळणे गावात झालेल्या प्रकाराचे पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील केर मोर्ले पाळी ये सोनावल या भागांमधून शेतकऱ्यांनी पुराव्यांसहित काही तक्रारी मनसे पदाधिकारी श्री. गवस यांच्याकडे सुपूर्त केले. त्यामुळे मनसे पदाधिकारी जाब विचारण्यासाठी माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली उपवनसंरक्षक सावंतवाडी येथे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांसहित घेरावा घालण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसात वनविभागाने हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावी अन्यथा आंदोलन निश्चित आहे. याची वनविभागाने नोंद घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा