You are currently viewing सर्व जातींच्या वधुवर मेळाव्याचा उपक्रम हा समाजाला दिशा देणारा – व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री.दिपक बेलवलकर 

सर्व जातींच्या वधुवर मेळाव्याचा उपक्रम हा समाजाला दिशा देणारा – व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री.दिपक बेलवलकर 

कणकवली :

 

कणकवली मध्ये सर्व जातींच्या संस्थानी एकत्र येऊन आयोजित केलेला वधुवर मेळावा हा समाजाला दिशा देणारा असल्याचे प्रतिपादन कणकवली व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. दिपक बेलवलकर यांनी मेळाव्याच्या उदघाटनाचे वेळी बोलताना केले.

सर्व जातीय वधुवर सूचक समन्वय समिती तर्फे हा मेळावा कणकवली एसटी स्टैण्ड समोरील सुमनराज ट्रेड सेंटर टेरेस हॉल येथे संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर गाबीत समाज जिल्हा संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर, मराठा महासंघाचे श्री. एस टी सावंत,वैश्य समाजाचे श्री. महेश काणेकर,कुंभार समाजाचे श्री. विलास गुढेकर, तेली समाजाचे श्री. नंदकुमार आरोलकर,कोष्टी समाजाचे श्री.रविंद्र मुसळे,शिंपी समाजाचे श्री. बापू महाडिक,मराठा समाजाचे श्री. सखाराम सपकाळ, सौ. वैभवी सावंत,अजित टाककर,सुनील तळेकर,नितीन तळेकर,श्री. मर्गज हे उपस्थित होते.

मेळाव्याचे प्रास्ताविक श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी केले. ते म्हणाले कि, सर्व जातींच्या वधुवरांच्या समस्या सारख्याच असून नोकरदार वरांची असलेली मागणी, मुलींकडून वराबाबतच्या वाढत्या अपेक्षा यामुळे पालकांच्या चिंता वाढल्या. त्यामुळेच आम्ही सर्व जातींच्या संस्थानी एकत्रित काम करण्याचा निर्णय घेऊन सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथमच हा मेळावा घेण्याचे निश्चित केले. यावेळी अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले. तसेच कांही वधु वरानी आपला परिचय करून देतांना जोड़ीदाराबाबतच्या अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या. श्री. सपकाळ यांनी वरांबरोबरच पालकांनी कोणताही संकोच न बाळगता वधुंची नोंदणी मोठ्या प्रमाणावर करण्याचे आवाहन केले.सर्व जातींच्या वधुवर मंडळानशी संपर्क करून स्थळे जुळविणयाचा प्रयत्न समन्वय समिती तर्फे करण्यात येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × five =