You are currently viewing ‘एक पणती आपल्या महाराजांसाठी’ दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे उपक्रम

‘एक पणती आपल्या महाराजांसाठी’ दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे उपक्रम

सावंतवाडी :

 

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागातर्फे दीपावलीच्या निमित्ताने दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागातर्फे आपल्या जिल्ह्यातील दुर्लक्षित झालेल्या महाराजांच्या स्मारकांची स्वच्छता करून स्मारकांसमोर एकतरी पणती लावून दीपावली साजरी करूया असा संदेश देण्यासाठी “एक पणती आपल्या महाराजांसाठी” असा उपक्रम प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही राबविला जाणार आहे.

दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी तसेच शिवप्रेमींनी गेली तीन वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या महाराजांच्या स्मारकांसमोर पणत्या लावून दीपावली साजरी केली होती. तसेच इतर जिल्ह्यातील शिवभक्तांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. यावर्षी आपणही आपल्या गावातील महाराजांच्या स्मारकांची स्वच्छता करून किमान एक पणती लावून आमच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ज्यांच्या जवळ महाराजांचे स्मारक नसेल अशा शिवभक्तांनी आपल्या घरातच महाराजांच्या मूर्ती किंवा फोटो समोर पणती ठेवून या उपक्रमात सहभागी व्हावे तसेच आपण कोणत्या गावातील महाराजांच्या स्मारकासमोर पणती लावणार आहात याबाबत (९८६०२५२८२५ ) गणेश नाईक अध्यक्ष दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग तसेच (९४०४५९८१४७ ) प्रसाद सुतार अध्यक्ष दुर्ग मावळा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्हा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्या गावातील महाराजांच्या स्मारकांसमोर आपण दीपावली साजरी करणार आहात त्या गावाचे नाव, आपले नाव, आपला भ्रमणध्वनी क्रमांक ही माहिती पाठवावी. तसेच प्रत्यक्ष दीपावली साजरी करत असतानाची छायाचित्रे अथवा आम्हाला पाठवावीत. या उपक्रमात सहभागी शिवप्रेमींना दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी माहिती ही दुर्गमावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश नाईक यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 16 =