You are currently viewing कवठणी ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर

कवठणी ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर

१७३ रुग्णांनी घेतला लाभ

सामाजिक उपक्रमामुळे ग्रामस्थांना दिलासा

सातार्डा
कवठणी येथील ग्रामपंचायतच्यावतीने 14 व्या वित्त आयोग अंतर्गत घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये 173 रुग्णांनी लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ शंकर सावंत यांच्याहस्ते या आरोग्य तपासणी शिबिराचे दीपप्रज्वलनाने उदघाटन करण्यात आले.या आरोग्य शिबिरामध्ये तपासणी केलेल्यांना चष्मे व लागणारी औषधे मोफत वाटप करण्यात आली.


यावेळी कवठणी सरपंच सुमन कवठणकर, उपसरपंच अजित कवठणकर, माजी सरपंच कावेरी कवठणकर, ग्रा. पं सदस्या साक्षी कवठणकर, संजीवनी कवठणकर, अक्षता कवठणकर,सद्गुरु कवठणकर,संतोष चोडणकर, तेजा सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुदन उर्फ सुधा कवठणकर, श्याम नाईक, मुख्याध्यापिका मधुरा जोग, संदेश कवठणकर, प्रशांत कवठणकर,बापू कवठणकर, ग्रामसेवक विश्वनाथ लाथये,अंगणवाडी सेविका आरती कोरगावकर, मदतनीस हर्षाली पार्सेकर, आशासेविका अश्विनी रेगे, बचत गट प्रतिनिधी रेखा रेडकर, योगिता जाधव उपस्थित होते.


या आरोग्य शिबारामध्ये डोळे तपासणी, नाक, कान, घसा, हिमोग्लोबिन व इतर आजारांची तपासणी करण्यात आली. डॉक्टर शंकर सावंत, विशाल पाटील, मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही डी जोशी, डॉ. पि एन यमगेकर, पर्यवेक्षक यु टी राणे, आरोग्यसेवक डी एम खेडकर, आरोग्यसेविका ए पि जंगम, एस ए हळदणकर, एस एस मोरजकर यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा