You are currently viewing सावंतवाडी तालुक्यात नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल

सावंतवाडी तालुक्यात नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल

५ दुकानदारांवर गुन्हे, १० जणांवर दंडात्मक कारवाई;

पोलिस निरीक्षक मेंगड़े यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहिम

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यात आज शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५ दुकानांवर कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल केले आहेत. यामध्ये मळगाव बाजारपेठेतील ३ किराणा दुकान आणि १ बेकरीवर कारवाई करण्यात आली असून, सावंतवाडी शहरातील १ दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच विना मास्क फिरणाऱ्या १० जणांवर देखील दंडात्मक कारवाई केली आहे. यावेळी पोलिस निरीक्षक मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय स्वाती यादव, पि एस आय यशवंते, ए एस आय डिसोजा, नाईक, मातोंडकर यांनी ही कारवाई केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + fourteen =