You are currently viewing मुणगे येथे भगवती वाचनालयामध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

मुणगे येथे भगवती वाचनालयामध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

देवगड :

 

माजी राष्ट्रपती ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त मुणगे येथील भगवती वाचनालयामध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्त वाचनालयामध्ये ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस वाचनालयाचे अध्यक्ष संतोष लब्दे, उपाध्यक्ष गोविंद सावंत, कार्यवाह शंकर उर्फ सुनिल मुणगेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी वाचनालयाचे कार्यकारीणी सदस्य महादेव उर्फ तात्या प्रभू, उज्ज्वला महाजन, रमाकांत सावंत, माजी पंचायत समिती सदस्या संजीवनी बांबुळकर तसेच वाचनालयाचे कर्मचारी विश्वास मुणगेकर, सोमनाथ रुपे, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा