दोडामार्ग तालुक्यात तंत्र कुशल मनुष्यबळाची भविष्यात गरज: अच्युत सावंत-भोसले

दहावी बारावी पास विदयार्थी वर्गाला सुवर्णसंधी

दोडामार्ग तालुक्यातील विद्यार्थ्यांना विशेष सवलत; २५ विद्यार्थीनींना मोफत वसतिगृहात राहण्याची सोय

दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात भविष्यात नव्याने होऊ घातलेल्या एमआयडीसी मुळे तंत्रकुशल मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी आतापासूनच प्रयत्न व्हायला हवे.यासाठीच दहावी,बारावी विध्यार्थ्यांनी टेक्निकल नॉलेज आणि स्किल एज्युकेशन घेणे काळाची गरज आहे. आपण या तालुक्याचा सुपुत्र असल्याने येथील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे अशी माहिती यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष श्री. अच्युत सावंत भोसले यांनी दोडामार्ग येथे स्नेह रेसिडेन्सी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

श्री.भोसले पुढे म्हणाले की, आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी 10 वी व 12 वी च्या परीक्षेत गेली अनेक वर्ष चांगला निकाल लागला आहे त्यामुळे कोकण बोर्ड राज्यात अव्वल ठरलेला आहे. आजच्या काळात टेक्निकल नॉलेज व स्किल एज्युकेशन ची खूप गरज आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारचं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी असणार आहे. गेली अनेक वर्ष यशवंतराव भोसले पॉलिटेक्निने शेकडो विद्यार्थी तंत्रशिक्षित केले. संस्थेचे असंख्य विद्यार्थी आज विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी कार्यरत आहेत. दोडामार्ग तालुक्यातील विद्यार्थीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत आहेत. भविष्यात आडाळी एमआयडीसी सारखे प्रकल्प इथे प्रस्तावित आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर देखील नोकरीच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचा फायदा घेण्यासाठी येथे दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पदविका अभियांत्रिकी सारखे शिक्षण घेणे काळाची गरज आहे. हे ओळखून

मी स्वतः दोडामार्ग तालुक्याचा सुपुत्र असल्याने येथील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न आहे. यासाठी यशवंतराव भोसले पॉलीटेक्निक तर्फे विविध योजना आखण्यात आलेल्या आहेत. संस्थेतील इंजिनिअरिंगचे शिक्षण SC, ST,SBC,NT विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांमुळे हे शिक्षण संपूर्णपणे मोफत मिळत आहे. तसेच या विद्यार्थ्यांना वसतिगृह सुविधा देखील पूर्णपणे मोफत ठेवण्यात आलेली आहे. ओपन व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनादेखील 50 टक्के फी सवलत जाहीर करण्यात आली आहे. दोडामार्ग तालुक्यातील विशेषतः 25 मुलींसाठी वसतिगृह सुविधा देखील मोफत ठेवण्यात आलेले आहे. या सर्व सवलतींचा फायदा घेऊन दोडामार्ग तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तंत्रकुशल बनावे व आपले उज्वल भवितव्य घडवावे. दोडामार्ग तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश सुविधा केंद्र टोपले कॉम्प्लेक्स दोडामार्ग बाजारपेठ येथे सुरू करण्यात आलेली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ठिकाणी संपर्क करावा असे आवाहन यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − three =