You are currently viewing वेंगुर्लेत भाजपा मध्ये इनकमिंग सुरुच..

वेंगुर्लेत भाजपा मध्ये इनकमिंग सुरुच..

*सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वेंगुर्ले शहरातील युवा कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश*

वेंगुर्ला :

 

वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष जगंन्नाथ उर्फ नाथा सावंत – मांजरेकर यांचे सुपुत्र व शहरातील भटवाडी येथील युवा नेतृत्व प्रीतम उर्फ पींटू सावंत यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्हयात रस्त्यांची पहाणी करण्यासाठी आले असता कुडाळ येथील एम.आय. डी.सी. विश्रामगृहामध्ये हा भाजपा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी नाम. रविंद्र चव्हाण यांनी सर्व युवकांचे भाजपा मध्ये स्वागत केले. तसेच मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व महाराष्ट्राचे नेते – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेले “शत प्रतीशत भाजपा” ही संकल्पना वेंगुर्ले शहरात सत्यात आणन्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच भाजपा मध्ये आपल्या कार्याचा सन्मान होईल असे अभिवचन दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सर्व युवा कार्यकर्त्यांचे अभिनंदन व स्वागत केले व भविष्यात भाजपा वाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. यावेळी प्रीतम सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या कार्यकतृत्वावर प्रभावीत होऊन भाजपा मध्ये प्रवेश करत असल्याचे सांगितले. तसेच प्रीतम सावंत यांच्या नेतृत्वाखाली स्वानंद पोतनीस, नितीन राणे, बसत्याव आरावुज, सुधीर पालयेकर, योगेश सावळ, प्रणिल सावळ, मनोहर पाटकर, कपिल सावंत, शुभम सावंत, नवनाथ सावंत, नितीन तेली, आदित्य खानोलकर, राकेश परब, भुषण सावंत, राजाराम सावंत, शानन आरावुज, कैतान आरावुज, अक्षय सावंत, प्रथमेश सावंत, बाळा गावडे, यतीन सावंत, केदार सावंत इत्यादी युवकांनी प्रवेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 3 =