You are currently viewing वायंबोशी रस्त्यावरील एसटी बस साठी अडचण होणाऱ्या विद्युत वाहिन्या उंच करा व रस्त्यावरील झाडी स्वच्छ करा

वायंबोशी रस्त्यावरील एसटी बस साठी अडचण होणाऱ्या विद्युत वाहिन्या उंच करा व रस्त्यावरील झाडी स्वच्छ करा

*वायंबोशी रस्त्यावरील एसटी बस साठी अडचण होणाऱ्या विद्युत वाहिन्या उंच करा व रस्त्यावरील झाडी स्वच्छ करा*

*- श्री मनुदेवी ग्रामस्थ मंडळ वायंबोशी यांची वीज वितरण महामंडळ वैभववाडी व ग्रामपंचायत एडगाव वायंबोशी कडे मागणी*

*भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या एसटी बस सेवा चालू करण्याच्या पाठपुराव्याला स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य*

*वैभववाडी-*

वैभववाडी वायंबोशी एसटी बस सेवा चालू करण्याबाबत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी जोरदार पाठपुरावा चालू केला आहे. सदर एसटी सेवा चालू करण्याकरिता आमदार नितेश राणे यांनी देखील आपल्याकडील शिफारस पत्र ही एसटी चालू होण्याबाबत दिले आहे. या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने 2021 रोजी एस टी महामंडळातर्फे एक सर्वे करण्यात आला होता त्याच्यामध्ये काही त्रुटी निघाल्या होत्या कोरोना आणि एसटी कर्मचारी संप यामुळे या कामाला दिरंगाई होत होती परंतु काळे यांच्या सातत्य पाठपुराव्यामुळे पुन्हा एकदा हा विषय अजंठ्यावरती आला आहे या पार्श्वभूमीवर वैभववाडी वायंबोशी रस्त्यावरील अडचण होणाऱ्या विद्युत वाहिन्या उंच करा व रस्त्यावरील झाडी स्वच्छ करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभाग कणकवली यांच्याकडील पत्र जा क्र.रा.प.विनिसी/वाह/चालन 342 दिनांक १२-०१-२०२४ या संदर्भीय पत्राद्वारे ग्रामपंचायत कडे महामंडळ यांनी केली होती याच अनुषंगाने संदर्भीय विषयानुसार श्री मनुदेवी ग्रामस्थ मंडळ वायंबोशी यांनी दिनांक 07 फेब्रु 2024 रोजी वीजवितरण महामंडळ वैभववाडी व ग्रामपंचायत एडगाव वायंबोशी कडे मागणी केली आहे.त्यामुळे भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे एसटी बस सेवा चालू करण्याच्या दृष्टिकोनातून चालू असलेल्या पाठपुराव्याला स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य मिळत आहे. गावचा विकास गावचा एकतेमुळेच होतो आणि तुम्ही देत असलेला पाठिंबा हाच आपल्या पाठपुराव्याचा मोठा केंद्रबिंदू ठरेल असं मत व्यक्त करून नवलराज काळे यांनी सर्व ग्रामस्थांचे व श्री मनुदेवी ग्रामस्थ मंडळ वायंबोशी यांचे जाहीर आभार मानले. यावेळी निवेदन देत असताना श्री मनुदेवी ग्रामस्थ मंडळ चे अध्यक्ष अजित अडूळकर, प्रकाश बा अडुळकर,गंगाराम भै अडूळकर,बयाजी गुरुखे, बिरू लंबोर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा