You are currently viewing मुंबई–गोवा महामार्गावर कंटेनर व डंपरमध्ये अपघात…

मुंबई–गोवा महामार्गावर कंटेनर व डंपरमध्ये अपघात…

हुंबरठ येथील घटना : दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान…

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावर हुंबरठ येथे कंटेनर व डंपरची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. या आपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची घटना आज दुपारी ०१.०० वा.च्या सुमारास घडली.
अपघातातील मेडिसीनची वाहतूक करणारा कंटेनर कणकवली च्या दिशेने येत होता. तर केसीसी बिल्डकॉनचा डंपर खारेपाटणच्या दिशेने जात असताना हुंबरठ येथे महामार्गावर हा अपघात घडला. अपघाताच्या आवाजाने तेथिल नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले. अपघाताचे स्वरूप पाहता सुदैवाने जीवित हानी टळली आहे. चालकांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =