You are currently viewing एलईडी मासेमारी बंद होण्यासाठी केंद्रीय मत्स्य खात्याकडे पाठपुरावा करणार…

एलईडी मासेमारी बंद होण्यासाठी केंद्रीय मत्स्य खात्याकडे पाठपुरावा करणार…

माजी केंद्रीयमंत्री, खा. सुरेश प्रभू यांची महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीला ग्वाही

मालवण :

मालवण मध्ये मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पारंपरिक मच्छिमारांच्या साखळी उपोषणाची माजी केंद्रीयमंत्री तथा राज्यसभा खासदार सुरेश प्रभू यांनी दखल घेतली आहे. ईईझेड अंतर्गत केंद्र सरकारने लागू केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी व्हावी व बेकायदेशीर एलईडी मासेमारी बंद व्हावी आणि पर्ससीन बोटींना मच्छिमारीसाठी देणारे परवाने केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमावली प्रमाणे करावे, अशी मागणी आपण केंद्रीय मत्स्य खात्याकडे करणार असल्याचे पत्र खा. प्रभू यांनी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीला दिले आहे.

खा. प्रभू यांनी याबाबत दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मच्छिमार कृती समितीमार्फत मच्छिमार बांधवाचे एलईडी व पर्ससीन मासेमारी विरोधात साखळी उपोषण मालवण येथे सुरु आहे. अनधिकृत एलईडी व पर्ससीन मासेमारीमुळे कष्टकरी पारंपारिक मच्छिमारांवर मोठा परिणाम झाला असून आर्थिक खाईत जात आहे. हे मी जाणून आहे. मी कायम पारंपारीक मच्छीमारांची बाजू घेवून संसदेत विषय मांडत आलो आहे. केंद्रात स्वतंत्र मत्स्यखाते निर्माण करावे ही मागणी प्रथमतः केली व ती मंजूर होऊन केंद्रात स्वतंत्र केंद्रीय मत्स्यखाते निर्माण झाले आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेला केंद्राने भरीव आर्थिक मदत दिली असून यामुळे छोट्या व पारंपारिक मत्स्यबांधवांना आर्थिक फायदा होणार आहे. ईईझेड अंतर्गत केंद्र सरकारने लागु केलेल्या नियमावलीची अमंलबजावणी व्हावी व बेकायदेशीर एलईडी मच्छिमारी बंद व्हावी व पर्ससीन बोटींना मच्छिमारीसाठी देणारे परवाने केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे करावे अशी मागणी मी केंद्रीय मत्स्यखात्याकडे करत असल्याचे पत्र खा. प्रभू यांनी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांना दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 18 =