You are currently viewing सिंधुदुर्ग रत्नागिरी हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला – संजय आंग्रे

सिंधुदुर्ग रत्नागिरी हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला – संजय आंग्रे

सिंधुदुर्ग रत्नागिरी हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला – संजय आंग्रे

कणकवली

रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर गेली अनेक वर्षे निवडणूक जिंकली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून जी विकासकामे झाली आहेत , ती लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत. महायुतीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी शिवसेना काम करेल,किरण सामंत यांनाच उमेदवारी जाहीर व्हावी,अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केली.

कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी शिवसेना महिला आघाडीप्रमुख वर्षा कुडाळकर ,उपजिल्हाप्रमुखशेखर राणे,तालुकाप्रमुख भूषण परुळेकर,शहराध्यक्ष प्रमोद मसुरकर,भास्कर राणे,सुनील पारकर,नाना सापळे,बाबू आचरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आताचे खासदार विनायक राऊत यांनी गेल्या १० वर्षात काय केलं? रोजगाराचे प्रकल्प आणले की त्याला विरोध केला जातो. विकासकामांच्या नावाने बोंब आहे . जनतेच्या हिताच्या प्रकल्पांना विरोध करून खासदार विनायक राऊत यांनी जनतेची दिशाभूल केली आहे.शिवसेना नेते किरण सामंत यांची उमेदवारी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर होईल.केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीचे नेते आहेत.त्यांनी सभांमध्ये कुठेही महायुतीचा उमेदवार असे म्हटले नाही,कुणाचीच उमेदवारी जाहीर झालेली नाही.किरण सामंत यांच्या उमेदवारीची आम्ही मागणी केलेली आहे,असे संजय आंग्रे यांनी सांगितले.

वर्षा कुडाळकर म्हणाल्या,शिवसेना महिला कार्यकर्त्यांच्या मला फोन येतात,कार्यकर्ते शांत का? अशी विचारणा होत आहे.मी लोकांना सांगत आहे,जो युतीत उमेदवार असेल त्यांचे काम केलं जाईल.मात्र,ही आमची शांतता ही वादळापूर्वीची असेल.शिवसेनेचा हा मतदारसंघ बालेकिल्ला आहे.त्यामुळे शिवसेनेचाच उमेदवार असेल.लोकांचा कल हा शिवसेनेकडे आहे, धनुष्यबाण हे चिन्ह माहीत आहे.तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील लोकांमधील उमेदवार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा