You are currently viewing पुढच्या वर्षी लवकर या…! अशी साद घालत गणेशभक्तांनी २१ दिवसांच्या लाडक्या गणराला निरोप

पुढच्या वर्षी लवकर या…! अशी साद घालत गणेशभक्तांनी २१ दिवसांच्या लाडक्या गणराला निरोप

पुढच्या वर्षी लवकर या…! अशी साद घालत गणेशभक्तांनी २१ दिवसांच्या लाडक्या गणराला निरोप…

वारकरी भजन, ढोल, लेझीम लक्षवेदी… तर देखावे खास आकर्षण…

सावंतवाडी
शहरातील सालईवाडा, उभाबाजार व वैश्यवाडा येथील २१ दिवसांच्या सार्वजनिक गणरायाला सोमवारी भक्तीभावानं निरोप देण्यात आला. पारंपरिक ढोल पथक व लेझीमच्या तालावर या मंडळांच्या विसर्जन मिरवणूका निघाल्या. यावेळी साकारलेले देखावे खास आकर्षण ठरले. पुढच्या वर्षी लवकर या…! अशी साद घालत गणेशभक्तांनी २१ दिवसांच्या लाडक्या गणराला निरोप दिला.

शहरातील २१ दिवसाच्या गणरायाला जल्लोषी वातावरणात निरोप देण्यात आला. शहरातील सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, उभाबाजार हनुमान मित्र मंडळ आणि वैश्यवाडा मित्र मंडळ या मंडळाच्या सार्वजनिक गणपती बाप्पासह काही घरगुती गणपती बाप्पाचे देखील मोती तलावात विसर्जन करण्यात आले. यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.. अशा घोषणांनी सर्व परिसर गणेशमय झाला होता. मंडळांकडून पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आल्या. सालईवाड्याच्या ढोलपथकासह वैश्यवाड्याच लेझीम पथक, उभाबाजारच वारकरी भजन हे विशेष लक्षवेधी ठरले. तर भगवानशंकर, विठ्ठल, तिरूपती बालाजी, मारूती, चिमुकल्याच पथनाट्य खास आकर्षण ठरलं. रात्री उशिरा मोठ्या भक्तिभावाने गणरायाला निरोप देण्यात आला.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा