You are currently viewing महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी ॲड. प्रणिता कोटकर

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी ॲड. प्रणिता कोटकर

विद्यार्थी हित व विकास आणि कल्याणाकरिता तसेच त्यांच्याविरुद्द होणाऱ्या अन्यायाविरोधात बंड पुकारून कार्य करण्याची तळमळ व प्रबळ इच्छेला प्रभावित होऊन संस्थापकीय बोर्डने एकमताने निर्णय घेऊन अँड प्रणिता कोटकर यांची अध्यक्ष -सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून निवड केलेली आहे.
“महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन” अर्थात “मासु” ही तळागळातील गरीब, दिनदुबळ्या, कष्टकरी, कामगार, शेतकरी, आदिवासी आणि मागासवर्गीय वर्गातील जनसामान्य विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क आणि अधिकारांच्या पूर्ततेसाठी बंड पुकारून संघर्ष करणारी “विद्यार्थी संघटना” आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा