कणकवली :
मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कळसुली परबवाडी पिंपळेश्वर नगर ते गावकरवाडी उल्हासनगर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कळसुली सरपंच सचिन पारधिये, उपसरपंच गणेश मठकर, शामसुंदर दळवी, मानसी दळवी, भारती देसाई प्रवीण दळवी दीपक मेस्त्री, राजू नार्वेकर, जयवंत घाडगावकर, लाडू गावकर, हेमंत वारंग, सावंत सर व ग्रामस्थ उपस्थित होते.