You are currently viewing कोकण मराठी साहित्य परिषद व श्री.अटलबिहारी वाजपेयी शाळा चराठे नं १ च्या संयुक्त विद्यमाने ” वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा

कोकण मराठी साहित्य परिषद व श्री.अटलबिहारी वाजपेयी शाळा चराठे नं १ च्या संयुक्त विद्यमाने ” वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा

*”गाव – शाळा तिथे कोमसाप” उपक्रमांतर्गत आयोजन*

वाचन संस्कृतीत सातत्याने वाढ व्हावी या उद्देशाने *डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम* यांचा *’जन्मदिन’* म्हणजे १५ ऑक्टोबर *”वाचन प्रेरणा दिन”* म्हणून साजरा करतात…
“पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक आहे…”
आपला विकास करायचा असेल तर ग्रंथाला मित्र बनविले पाहिजे ही संकल्पना सत्यात आणण्यासाठी समाजामध्ये वाचनाप्रती जनजागृती होणे आवश्यक आहे. वाचन प्रेरणा दिन म्हणून…मनी डोकावायची वेळ झाली….शोध घेऊयात का शांतपणे…
हातात लेखणी कशी आली…? या उक्तीप्रमाणे समाजात वाचन संस्कृती वाढावी, हाती लेखणी यावी यासाठी शाळा, गाव पातळीवरून जनजागृती व्हावी जेणेकरून मुलांना बालपणापासून लेखन, वाचनाची आवड निर्माण होईल आणि भविष्यात त्या छोट्या मुलांमधून साहित्यिक तयार होतील हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेने “गाव शाळा तिथे कोमसाप” हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांतर्गत आज कोमसाप सावंतवाडी शाखा व श्री.अटलबिहारी वाजपेयी शाळा चराठे नं १ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ डॉ.ए पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजे १५ ऑक्टोबर हा *”वाचन प्रेरणा दिन”* म्हणून साजरा केला. यावेळी शाळेतील अनेक छोट्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी कविता सादर केल्या त्याचप्रमाणे पुस्तक परिचय दिला. यात प्रामुख्याने कु.जानवी जाधव, कु. सिया नाईक, कु.लावण्या मसुरकर, कु.स्नेहल माजगावकर यांनी पुस्तक परिचय करून दिला तर कुमार साबा गोसावी, कु.गायत्री चराठकर, कु.मैथिली पटेकर, कु.पौरवी जाधव, कुमार पार्थ बोलके, कु.स्वरा वेजरे यांनी नवनवीन कविता सादर केल्या. मुलांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थित सर्व भारावून गेले. मुलांच्या सादरीकरणानंतर कोमसाप तालुका कार्यकारिणी सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांनी “खरे खोटे भाव” ही मानवी स्वभावावरील वृत्तबद्ध कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कवी रामदास पारकर यांनी मालवणी कविता व मिमिक्री सादर करून हास्य पेरले. श्री.दिगंबर पावसकर यांनी देखील छोटीशी मालवणी कवितेची झलक सादर करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमसाप तालुका उपाध्यक्ष पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष पत्रकार संतोष सावंत यांनी मानले. विधिज्ञ तथा कोमसाप सदस्य नकुल पार्सेकर, विधिज्ञ प्रा.अरुण पणदूरकर, माजी तालुकाध्यक्ष प्रा.सुभाष गोवेकर, सरपंच बाळू वाळके आदींनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक बापूशेट कोरगावकर यांनी केलं. या कार्यक्रमासाठी कोमसाप सावंतवाडी चे कार्यकारिणी तालुकाध्यक्ष संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, मा.तालुकाध्यक्ष प्रा.सुभाष गोवेकर, विधिज्ञ प्रा.अरुण पणदूरकर, विधिज्ञ नकुल पार्सेकर, कवी रामदास पारकर, मुख्याध्यापिका श्रीम.वर्षा देसाई, श्रीम.जयश्री पेडणेकर, श्रीम.अनघा निरवडेकर, श्रीम.श्रावणी सावंत, श्रीम.धनदा शिंदे, श्री.अमोल कोळी, केंद्रप्रमुख श्री.नरेंद्र सावंत आदी शिक्षकवृंद त्याच प्रमाणे शाळा व्य. स.अध्यक्ष श्री.समीर नाईक, श्रीम.शमिका नाईक, श्री.दिगंबर पावसकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 7 =