You are currently viewing खास. सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल बँकेचे उद्घाटन

खास. सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल बँकेचे उद्घाटन

कुडाळ

खासदार मा. श्री.सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग व गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेतर्गत कुडाळ तालुका सायकल बँकचे उद्घाटन रविवार दि. ११ जुलै, २०२१ रोजी सकाळी ११ वा. जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय, वाडोस येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात सायकल बँक अंतर्गत या हायस्कुल मधील १० विद्यार्थिनीना मोफत सायकल देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला भा.ज.पा. कुडाळ तालुका सरचिटणीस श्री. योगेश बेळणेकर, हायस्कुल मुख्याध्यापक श्री.सावंत सर, जन शिक्षण संस्था प्रतिनिधी महेश धुरी, रमेश खरात तसेच  सुरेश धुमक, दिनेश सुभेदार, दीपक म्हाडगुत,  सागर जाधव, सिद्धेश धुरी, नाना म्हाडगुत, श्री कडव सर, विजय चव्हाण तसेच विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. यावेळी सुरेशजी प्रभू  वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीस शुभेच्या देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + seven =