कोकिसरेतील दोन युवा खेळाडूंची राज्याच्या क्रिकेट संघात निवड

कोकिसरेतील दोन युवा खेळाडूंची राज्याच्या क्रिकेट संघात निवड

खेळाडू ओंकार व वृत्तीक यांचा वैभववाडी भाजपच्या वतीने सत्कार.

वैभववाडी
तालुक्यातील कोकिसरे गावच्या दोघा युवा खेळाडूंची महाराष्ट्र राज्याच्या टेनिस क्रिकेट संघात निवड झाली आहे. ओंकार प्रकाश नेवरेकर व वृतीक प्रकाश बेळेकर अशी या दोन युवा खेळाडूंची नावे आहेत. निवड झालेल्या दोन्ही खेळाडूंचे वैभववाडी भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. ओडिसा येथील भुवनेश्वर येथे 9 मार्च ते 14 एप्रिल 2021 या कालावधीत ही राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत तालुक्यातील या खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत केलेल्या कामगिरीचा विचार करून या दोघांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वैभववाडी भाजपच्या वतीने या दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, माजी सभापती मंगेश गुरव, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, महिला मोर्चा अध्यक्ष भारती रावराणे, शुभांगी पवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किशोर दळवी, ग्रा. पं. सदस्य प्रदीप नारकर, प्रकाश पाटील, आनंद फोंडके, प्रकाश पाटील कृष्णा गुरव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा