You are currently viewing रस्त्यावर बेकायदेशीर जमाव करून फटाके वाजवले व शांतता भंग केल्याच्या आरोपावरून पाच जणांची निर्दोष मुक्तता

रस्त्यावर बेकायदेशीर जमाव करून फटाके वाजवले व शांतता भंग केल्याच्या आरोपावरून पाच जणांची निर्दोष मुक्तता

ॲड.अशपाक यांचे यशस्वी युक्तिवाद

दिनांक 31 12 2019 रोजी दुपारी 12.30 च्या दरम्याने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी चालू होती. दरम्याने त्या दिवशी मतमोजणी सुरू असताना नूतन पत्रकार भवन इमारती समोरील बॅरीगेट जवळ महाविकास आघाडीचे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमलेले होते. तेथे पाच पेक्षा अधिक व्यक्ती जमून त्यांनी फटाके लावले व मोठमोठ्याने घोषणा केल्या. तसेच मा. जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला व फटाके वाजव शांततेचाही भंग केला म्हणून संदेश भास्कर पारकर, रिनेश अशोक चव्हाण, भास्कर बाबाजी राणे, राजू नरेश राठोड, सचिन प्रकाश सावंत, यांचेवर भा.द.वि. कलम 143 व 149, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्ह्याचा ठपका ठेवलेला होता.

सदर कामे वरील नमूद 1 ते 5 आरोपींचे विरुद्ध सबळ पुरावा आला नसल्याने मे. मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब ओरोस श्री. ए. एम. फडतरे यांनी पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. संशयित आरोपींच्या भवतीने ॲड. अशपाक शेख यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 7 =