You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी पुरस्कृत घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धाचे बक्षीस वितरण समारंभ सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी पुरस्कृत घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धाचे बक्षीस वितरण समारंभ सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते संपन्न

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी पुरस्कृत आणि प्रत्येक तालुकानिहाय काँग्रेस कमिटी आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील गणेशोत्सव या सणानिमित्त घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

सदर स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रायोजित केली होती. प्रत्येक तालुक्यात स्वतंत्रपणे त्या त्या तालुक्यातील तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या समन्वयातून
*शुक्रवार दि. २ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर* दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली.
सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे मा.गृहराज्य मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मा.संपर्क मंत्री  *सतेज ऊर्फ बंटी पाटील* यांच्या हस्ते महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे करण्यात आला.


प्रत्येक तालुक्यातील प्रथम क्रमांकाला ११,१११/- रूपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रत्येक तालुक्यातील द्वितीय क्रमांकाला ७,७७७/- रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रत्येक तालुक्यातील तृतीय क्रमांकाला ५,५५५/- रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
तसेच प्रत्येक तालुक्यात दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी १,१११/- रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात आले.

सदर कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.गुलाबराव घोरपडे,सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, माजी अध्यक्ष विकासभाई सावंत, कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षा आफ्रिन करोल,महिला बालकल्याण समीती सभापती अक्षता खटावकर, उपाध्यक्ष नागेश मोर्ये, विजय प्रभू,सरचिटणीस प्रकाश जैतापकर, चंद्रशेखर जोशी,सुगंधा साटम, विभावरी सुकी,अरविंद मोंडकर, सुशील राणे,केतनकुमार गावडे,महेश अंधारी, देवानंद लुडबे, श्रीकृष्ण तळवडेकर, किरण टेंबुलकर,सुंदरवल्ली पडीयाची,डाॅ.मयूर शारबिद्रे, प्रवीण वरुणकर,विद्याप्रसाद बांदेकर, रवींद्र म्हापसेकर, सुभाष दळवी, आनंद परूळेकर, एकनाथ नाईक, विधाता सावंत, महेंद्र सांगेलकर, मेघनाद धुरी, वासुदेव नाईक, उल्हास मणचेकर, उमेश कुलकर्णी, प्रदिप मांजरेकर, अभय शिरसाट, सिद्धेश परब, मीनाताई बोडके, वसंत नाटेकर, भालचंद्र जाधव, आनंद पवार, अ‍ॅड. राघवेंद्र नार्वेकर, रुपेश आईर, अशोक राऊळ, संदिप सुकी, सुधीर मल्हार, स्मीता वागळे, जस्मीन लक्शमेश्वर, संजय लाड, उत्तम चव्हाण, मयूर आरोलकर, मनिष परब, चंद्रकांत राणे,जेम्स फर्नांडिस, सरदार ताजर,योगेश्वर कुर्ले,सुरज घाडी, मंदार शिरसाट, तबरेज शेख, चिन्मय बांदेकर, तौसीफ शेख, शुभांगी काळसेकर,रंजना जळवी,सोनल सावंत,गोविंद कुंभार, उल्हास शिरसाट, सतीश हुर्लीकुप्पी, अशोक राणे, समीर वंजारी,विजय खाडे, बाळा नमशी, शाहिन शेख, वैभव आजगावकर, दिनेश आसोलकर, मणेरीकर, विजेते स्पर्धक इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा