नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत; शहराची कायदा-सुव्यवस्था, वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षेबाबत चर्चा
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी नुकतीच सावंतवाडी नगरपालिकेला विशेष सदिच्छा भेट दिली. यावेळी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी डॉ. दहिकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या सदिच्छा भेटीदरम्यान पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, सभापती आणि नगरसेवक यांच्यात शहराची कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. शहराचा विकास आणि नागरिकांची सुरक्षितता या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रशासन व पोलीस विभाग यांच्यात उत्तम समन्वय राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
शहरातील वाढती वाहतूक, कायदा-सुव्यवस्था, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पोलीस व नगरपालिका प्रशासनाने समन्वयाने काम करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
या प्रसंगी शेखर सामंत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालकेर, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुनीता पेडणेकर, सुकन्या टोपले, देवेंद्र टेमकर, सिद्धार्थ भांबुरे, स्नेहा नाईक, ॲड. नकुल पार्सेकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
