You are currently viewing चिंदर गावातील गुरे दगावलेल्या शेतकऱ्यांची आ. वैभव नाईक यांनी घेतली भेट

चिंदर गावातील गुरे दगावलेल्या शेतकऱ्यांची आ. वैभव नाईक यांनी घेतली भेट

नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आजारी गुरांची पाहणी करत तपासणी व लसीकरण करण्याच्या दिल्या सूचना*

मालवण तालुक्यातील चिंदर गावात साथीच्या रोगाने ३४ गुरे दगावली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार वैभव नाईक यांनी आज चिंदर गावातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या गोठ्यात जाऊन आजारी असलेल्या गुरांची पाहणी केली. यावेळी मालवण गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, मालवण कृषी अधिकारी विजय गोसावी,पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. तुषार वेर्लेकर यांच्याशी आजाराच्या निदानाबाबत आ. वैभव नाईक यांनी चर्चा केली. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्याशी संपर्क करत साथीच्या रोगावर उपाययोजना करण्यासाठी गावातील सर्व गुरांची तपासणी करून लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या.
निलेश रेवडेकर, मिलिंद चिंदरकर, बाबू परब यांच्या घरी आजारी असलेल्या गुरांची पाहणी आ. वैभव नाईक यांनी केली.तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आ. वैभव नाईक यांनी देत शेतकऱ्यांना धीर दिला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, उपविभाग प्रमुख अनिल गावकर, भाऊ परब, पप्पू परुळेकर, शाखा प्रमुख मिलिंद चिंदरकर,सतीश हडकर,संतोष पाटणकर, विल्यम फर्नांडिस, अमित कानविंदे, संजू सामंत, प्रसाद टोपले, निशांत पारकर, संजय हडपी, निलेश रेवडेकर,शाम घाडी विजय रेवडेकर आदी ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा