उपनगराध्यक्ष पदी गणेश उर्फ बंडू हर्णे यांची निवड…

उपनगराध्यक्ष पदी गणेश उर्फ बंडू हर्णे यांची निवड…

कणकवली:

 

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मुख्य उपस्थितीत नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांनी माजी उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड यांच्याकडून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सलग तीन वेळा नगरसेवक पदी निवडून आलेल्या नगरसेवक बंडू हर्णे यांना उपनगराध्यक्ष पदासाठी पराभव मिळाला होता. गेल्या साडे बारा वर्षात सहा वेळा उपनगराध्यक्ष निवडले गेले, असूनही प्रत्येक वेळी हर्णे यांना आपसातील राजकीय समेटीमुळे उपनगराध्यक्ष पदासाठी पराभव पत्करावा लागला होता.

 

मात्र यंदा खुद्द नारायण राणे यांनी गणेश हर्णे यांची उपनगराध्यक्ष पदासाठी संमती दर्शविली. यावेळी बंडू हर्णे यांनी ‘राणे कुटुंबियांचा आणि आणि शहर वासियांचा विश्वास हा शहर विकासात प्रगती करून जोपासेन’ असा विश्वास व्यक्त केला आहे.

 

 

याप्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे, जि. प. माजी उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, बांधकाम सभापती संजय कामतेकर, नगरसेवक अभी मुसळे, विराज भोसले, शिशिर परुळेकर, नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, कविता‌ राणे, पूर्वी कांबळे, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, कन्झुमर्स सोसायटी चेअरमन संदीप नलावडे, भाजपा नगराध्यक्ष अण्णा कोदे, चारू साटम, राजा पाटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा