You are currently viewing मळगाव रवळनाथ मंदिर येथे जागर उत्सवास प्रारंभ

मळगाव रवळनाथ मंदिर येथे जागर उत्सवास प्रारंभ

सावंतवाडी :

 

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरातील जागर उत्सवास मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. या जागर उत्सव कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात दरवर्षी कोजागिरी पोर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत जागर उत्सव होत असतो. महिनाभर सुरू असलेल्या या जागर कालावधीत दर दिवशी मंदिरात पुराणवाचन व मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा काढली जाते.

पालखीनंतर उपस्थित सर्वांना प्रसाद वाटप करण्यात येते. तसेच पालखी नंतर स्थानिक व आमंत्रित भजन मंडळे आपली भजने सादर करतात. त्रिपुरारी पौर्णिमेला रवळनाथ देवाच्या वार्षिक जत्रोत्सवाने या जागराची सांगता केली जाते. यंदा रवळनाथ देवाचा जत्रोत्सव ७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या जत्रोत्सवानंतर गावातील जत्रोत्सवास प्रारंभ होतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + six =