You are currently viewing नूतन विद्यालय कळणेचा गणित संबोध परीक्षेत 100% निकाल

नूतन विद्यालय कळणेचा गणित संबोध परीक्षेत 100% निकाल

दोडामार्ग :

दोडामार्ग तालुक्यातील नूतन विद्यालय कळणे या प्रशालेने ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी मधील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100% लागला. त्यांना गणित विषय शिक्षक प्रसाद गोसावी व उमेश देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्राचार्य एम. डी. देसाई, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =