You are currently viewing न्हावेली गावातील लोकांसाठी विनाशुल्क जीवन सुरक्षा कवच

न्हावेली गावातील लोकांसाठी विनाशुल्क जीवन सुरक्षा कवच

न्हावेली तील युवकांचे जनसेवच्या दिशेने पाऊल

न्हावेली
महाराष्ट्रातील कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड झोन यात समावेश झाला आहे याचा विचार करत न्हावेलेतील तरुण वर्गाने एकत्र येत गावातील सर्व व्यक्तींचा जीवन विमा मोफत स्व-खर्चाने करून देण्याचा निर्णय घेतला आहे कोरोनाच्या महामारी मध्ये अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागले त्यात काही लोक रोजनदारी करून कुटुंब चालवायचे यातच कोरोना या संवसर्गजन्य रोगामुळे त्यांना जीव गमवावा लागला अश्या कुटूंबाचा कमवता व्यक्ती गेल्याने काही कुटूंब रस्त्यावर आली आहेत एखाद्या कुटुंबाच्या प्रमुखाचे कोरोना मुळे अचानक जाणे आणि त्या कुटुंबावर होणारे मानसिक परिणामा बरोबर आर्थिक परिणाम याचा विचार करत न्हावेलेतील तरुण वर्गाने एकत्रीत येत गावातील सर्व कुटुंबातील सर्व व्यक्तीचा मोफत जीवन विमा करण्याचा ठरवले आहे
यासाठी लागणार सर्व खर्च हे युवक स्व-खर्चातून करणार आहेत . भविष्यात कुटूंबातील कर्ता व्यक्ती निघून गेल्यास कुटूंबाला आधार मिळावा व आर्थिक अडचण दूर व्हावी या उद्देशाने तरुण वर्गाने उचलेले हे पाऊल मोलाचे आहे .
रविवार दिनांक 6 जुन पासून गावातील प्रत्येक वाडी मध्ये विम्याचे अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत हे अर्ज भरण्यासाठी विमा धारकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा