You are currently viewing सिंधुदुर्गातील रस्ते, पर्यटन व अनेक समस्यांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार – राजन तेली

सिंधुदुर्गातील रस्ते, पर्यटन व अनेक समस्यांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार – राजन तेली

भाजपच्या पहिल्याच पालकमंत्र्यांचे जल्लोषी स्वागत होणार..

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच भाजपचे पहिले पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नाम. रवींद्र चव्हाण हे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्गात येत असल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पालकमंत्र्यांच्या या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात जिल्ह्यातील रस्ते, पर्यटन व अनेक समस्यांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.

कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपा सरचिटणीस प्रमोद रावराणे,राजन चिके,राजेंद्र रावराणे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

राजन तेली म्हणाले,ठाकरे सरकारच्या काळात शुक्रवारी पळणारे आणि मंगळवारी येणाऱ्या अधिकाऱ्यांना या दौऱ्यात सरकार बदललेले असल्याची समज दिली जाणार आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातील आढावा नाम. रवींद्र चव्हाण घेणार आहेत.आगामी काळात सिंधुदुर्गातील रस्ते, पर्यटन विकासासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.

भाजपाचे नेते,पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आता नव्याने ३ घाट रस्ते तातडीने होण्याची आवश्यकता आहे.त्यात घोडगे सोनावडे घाट,आंबोली घाटाला पर्याय केसरी फणसवडे रस्ता, माणगाव खोऱ्याततून कोल्हापूरला जोडणारा आंजिवडे घाट हा एक रस्ता व्हावा ,अशी मागणी जनतेची आहे.तसेच पर्यटनावर व्यापार वाढीसाठी योजना हाती घेण्यासाठी ठोस धोरण हाती घेण्याची मागणी आहे.तसेच राष्ट्रीय महामार्ग झालेले गगनबावडा व फोंडाघाट,आंबोली हे तीनही रस्ते मोठे व्हावेत,कारण या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन ना.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले होते,त्या कामांना गती देण्याची आमची मागणी असणार असल्याचे राजन तेली यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याकडे गेल्या अडीज वर्षात ठाकरे सरकारने दुर्लक्ष केलं असल्याने हे रस्ते होण्यासाठी पालकमत्र्यांना आम्ही विनंती करणार आहोत. काही रस्ते किनारट्टीला जोडणारे रस्ते आहेत,त्यात कासारडे-विजयदुर्ग, नांदगाव – कसाल, मालवण- कुडाळ,कुडाळ – चीपी विमानतळ, सावंतवाडी- वेंगुर्ले आदी रस्ते महत्वाचे आहेत,ते रस्ते होण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.पर्यटन वाढीसाठी आवश्यक रस्त्यांना तातडीने मंजुरी द्यावी,ही मागणी करणार असल्याचे राजन तेली यांनी सांगितले.

जिल्ह्यात काही अधिकारी शुक्रवारी जातात, ते सोमवार सायंकाळी किंवा मंगळवार पर्यंत येत नाहीत.त्या अधिकाऱ्यांना सरकार बदलले असल्याची जाणीव नाही.जेणेकरून चांगले प्रशासन द्यायला हवे,त्या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत.जनतेला चांगल्या प्रकारे न्याय मिळेल,अशी भूमिका आमची असेल असे राजन तेली यांनी सांगितले.

गतवेळी भाजपा युतीमध्ये असताना दूजाभाव केला जात असे,आता स्वतःचा पालकमंत्री येत आहे.भाजपा कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा आहे.त्यामुळे भाजपा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.शासकीय दौरा आटोपल्यावर ना.रविंद्र चव्हाण पक्षीय कामकाजाचा आढावा घेतील.तिन्ही विधानसभा बैठका घेणार आहेत. पुल व रस्ते कामे मार्गी लावली जातील.नाबार्डमधून जास्तीत जास्त निधी दिला जाईल.जिल्हा परिषद,२५-१५ माध्यमातून तळागाळापर्यंत विकास केला जाईल.ठेकेदाराच्या हितापेक्षा जनतेच्या हिताचे काम केले जाईल,असा विश्वास राजन तेली यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =