You are currently viewing स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पश्चिम भारतात दुसरी

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पश्चिम भारतात दुसरी

प्रशासक प्रजित नायर, डेप्युटी सीईओ विनायक ठाकूर यांनी स्वीकारला सन्मान

ओरोस

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) ट्प्पा 2 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण 2021 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने पश्चिम भारतात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांक पटकविला आहे. विज्ञान भवन, दिल्ली येथे एका कार्यक्रमांत केंद्रिय ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यामुळे स्वच्छ्ता अभियानामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने दुसऱ्या वेळी यश संपादन केले आहे.
यावेळी केंद्रिय जलशक्ती मंत्री गजेद्रसिंग शेखावत, केंद्रिय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल, केंद्रिय सचिव स्वच्छता मंत्रालय श्रीम. विनी महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा 2 अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार 2021-22 या वर्षात राज्यातील ग्रामिण भागात स्वच्छ सर्वेक्षण सुरु करण्यात आले होते. हे सर्वेक्षण देशातील 17 हजार 450 गावे व 698 जिल्ह्यात केंद्र स्तरावरुन नेमण्यात आलेल्या संस्थेमार्फत करण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा